Ladaki Bahin Yojana May Hafta महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींना अर्थातच लाडक्या बहिणींना पडलेला एकमेव प्रश्न म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी येणार? मे महिन्याचे पैसे कुठे अडकले आणि मागील दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणींना सरकार पैसे देण्यासाठी का विलंब करत आहे असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत आता मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार इतर हप्ता बद्दल काय अपडेट आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
Ladaki Bahin Yojana May Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज दिनांक 2 जून 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचे देखील कबूल केले आहे तसेच यामध्ये आमच्या देखील काही चुका आहेत हे देखील त्यांनी सांगितले.
आता हे कशामुळे तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजना घोषित झाल्यानंतर राज्यामध्ये काही महिन्यांमध्येच विधानसभांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि त्यामुळेच मतदानासाठी त्यावेळी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया अथवा पडताळणी योग्य पद्धतीने केली नाही आणि ज्यांनी अर्ज केला त्या सर्व महिलांना योजनेमध्ये पात्र केले आणि त्यांना योजनेअंतर्गत मिळणारा लाभ देखील जमा करण्यात आला.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता जवळपास पाच सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे आणि आता मात्र राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देत असताना मोठा बोजा पडत आहे आणि यामुळेच आता पुन्हा एकदा अर्जांची छाननी प्रक्रिया अथवा पडताळणी सुरू असून यामध्ये चुकीच्या पद्धतीने अथवा अटी व निकषांना सोडून ज्या महिला आहेत त्यांना योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे आणि त्यांना पुढील हप्ते देखील देण्यात येणार नाहीत.Ladaki Bahin Yojana May Hafta
Ladaki Bahin Yojana May Hafta Date
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हफ्ता कधी येणार ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकार द्वारे 23 मे रोजी आणि 28 मे रोजी दोन अधिसूचना अथवा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आले होते आणि ज्या अंतर्गत मे महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास विभागाकडे सुमारे 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.
आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती दोन-तीन दिवसांमध्ये पैसे जमा होतील असे देखील सांगण्यात आले होते परंतु त्या दरम्यानच लाडकी बहीण योजनेअंतर्गत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे आता योजनेअंतर्गत महिलांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे.
ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्त्याचे वितरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभाग यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे.
