Ladki Bahin June Installment लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आता अंतिम टप्प्यात आला असून आज म्हणजेच दिनांक 10 जुलै 2025 पर्यंत योजनेअंतर्गत सर्व महिलांना निधी जमा केला जाणार आहे.
योजनेचा बारावा अर्थातच जून महिन्याचा हप्ता दिनांक पाच जुलै पासून मिळण्यास सुरुवात झाली आणि आज हप्ता वितरणासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार किंवा तुम्हाला आज पैसे मिळणार का नाही याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.
Ladaki Bahin Yojana June Hafta Date
मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना आता जून महिन्याचा देखील लाभ त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आला आहे.
परंतु यामध्ये हप्ता वितरण होण्यासाठी किंवा खात्यावरती पैसे येण्याकरता बराच उशीर झाल्याने आम्हाला योजनेचा लाभ मिळणार का नाही आता देखील प्रश्न लाडक्या बहिणींना पडत होता परंतु आता जवळपास सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत लाभ देखील वर्ग करण्यात आला आहे.
आणि आज ज्या सर्व महिला बाकी आहेत ज्यांना योजनेअंतर्गत सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील अजूनही लाभ जमा झाला नव्हता त्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आज योजनेचे पैसे जमा होणार आहेत.Ladki Bahin June Installment
Ladaki Bahin Yojana June Installment List
आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे वितरण बाकी आहे याबद्दल बोलायचे झाल्यास सर्वाधिक पुणे जिल्हा, मुंबई त्यासोबतच नागपूरमधील काही महिला सोलापूर असेल अथवा कोल्हापूर जिल्ह्यामधील देखील काही महिलांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत पैसे जमा होण्याची प्रक्रिया आजपासून पार पडत आहे.
मित्रांनो योजनेचा हक्क हा 5 जुलैपासूनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली परंतु त्यानंतर रविवार असल्याने महिलांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यानंतर सोमवार असेल अथवा मंगळवारी देखील कमी प्रमाणामध्ये हप्त्याचे वितरण झाले होते परंतु आता हे वितरण अंतिम टप्प्यात आले असून जवळपास योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आज पर्यंत जमा होणार आहे आणि त्यामुळे सर्व ज्या लाभार्थी अथवा पात्र बहिणी असणार आहेत त्यांना योजनेअंतर्गत निधी जमा केला जाणार असल्याची नोंद घ्यायची आहे.Ladki Bahin June Installment
लाडकी बहिण योजना अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
