Ativrushti Anudan Maharashtra 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्यासाठी पुढील हंगामामध्ये उपयोगी व्हावे म्हणून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
यासोबत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता विहित दराने मदत देखील देण्यात येते यासाठी शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत अतिवृष्टी, पूर किंवा चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करिता त्यासोबतच इतर देखील नुकसानी करिता बाधितांना मदत प्रदान करण्यास आता शासनाने मान्यता देखील देण्यात आली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार त्यासोबतच किती रुपये मंजूर करण्यात आले आहेत याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत.
अतिवृष्टी,पूर बाधित शेतकऱ्यांना 6475 कोटी निधी मंजूर
शेतकरी मित्रांनो जून 2023 ते डिसेंबर 2024 च्या दरम्यान अतिवृष्टी व पूर यामुळे झालेले शेती पिके त्यासोबतच शेतजमीन बघून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे, नाशिक आणि कोकण यांचेकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. यावर आता जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये राज्यात झालेले नुकसानीसाठी बाधितांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार सुमारे 64 कोटी 75 लाख 83 हजार एवढा निधी मंजूर करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
आणि आता या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर समाधान मिळणार आहे. या शासन निर्णयांमध्ये नमूद केल्यानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांच्या मालमत्तेचे जसे की कपडे असतील घरगुती भांडे असतील यांचे नुकसान झाल्यास त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांकडून प्राप्त प्रस्तावा मधील ज्या मदतीकरता प्राधिकारक कोषागार देयक सादर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत आणि ते बघून प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई रकम
नुकसान भरपाई रक्कम कोणत्या जिल्ह्याला मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये गडचिरोली जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा त्यासोबतच गोंदिया जिल्हा, वर्धा, भंडारा जिल्हा या नागपूर विभागातील जिल्ह्यांना नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे.
कोकण विभागातून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
त्यानंतर छत्रपती संभाजी नगर विभागातून छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्हा, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यासाठी तसेच परभणी जिल्ह्यासाठी देखील नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे.
अमरावती विभागातून यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे.
पुणे विभागातून पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाले आहे.
नाशिक विभागातून अहमदनगर, धुळे नंदुरबार, नाशिक,जळगाव या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे.Ativrushti Anudan Maharashtra 2024
