Indigo Monsoon Sale Offer 2025 मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना विमानातून प्रवास करायची इच्छा असते परंतु तिकिटांचे दर पाहून आपल्या खिशाला हा प्रवास परवडत नाही आणि त्यामुळेच आपण सर्व हा प्रवास टाळतो. परंतु या मान्सून अर्थातच पावसाळ्यामध्ये तुम्हाला विमान प्रवास करण्यासाठी सर्वात मोठी संधी असणार आहे कारण फक्त 1499 रुपये मध्ये तुम्ही विमानातून प्रवास करू शकणार आहात आणि ते देखील भारतात कुठेही. हे खरं आहे का तर हे 100% खर आहे कारण इंडिगो एअरलाइन्स या अत्यंत महत्त्वाच्या कंपनीने ही ऑफर सुरू केली आहे आणि या सुवर्णसंधीचा तुम्ही सर्वांनी नक्कीच लाभ घ्यायचा आहे.
Indigo Monsoon Flight Tickets Offer 2025
मित्रांनो सध्या पावसाळा सुरू असून या पावसाच्या दिवसात अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतात घराबाहेर पडत असतात फिरत असतात आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये पर्यटन चांगल्या प्रमाणामध्ये विकसित झाले आहे आणि हेच निसर्गाचे रूप पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक फिरत असतात. हेच लक्षात घेऊन इंडिगो ने मान्सून सेल आयोजित केलेला आहे आणि यासाठी देशांतर्गत विमान प्रवास हा फक्त 1499 रुपयांमध्ये तुम्हाला करता येणार आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला परदेशवारी करायचे असल्यास तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आणि फक्त तुम्ही 4399 रुपयांमध्ये परदेशात देखील जाऊ शकणार आहात आहे ना ही एक जबरदस्त ऑफर.
आता ही ऑफर किती दिवस आणि कधीपर्यंत सुरू असणार तर इंडिगो ची ही ऑफर दिनांक 24 जून 2025 पासून सुरू झाली आहे आणि 29 जून 2025 पर्यंत ही ऑफर चालणार आहे. आता ही जी तारीख असणार आहे ही बुकिंग साठी असणार आहे आणि बुकिंग साठी देखील तुम्ही दिनांक 01 जुलै 2025 ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत या तिकिटांचा लाभ घेऊन तुमचा प्रवास तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. Indigo Monsoon Sale Offer 2025

त्यामुळेच कुठल्याही प्रकारची चिंता नाही दोन-तीन महिन्यांमध्ये तुम्हाला प्रवास करत असल्यास तुम्ही नक्कीच तुमचे तिकीट काढून घ्या आणि या ऑफरचा अवश्य लाभ घ्या. इतरही विमानामध्ये मिळणाऱ्या अनेक सुविधांवरती या ऑफर च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट सुरू आहेत ज्याची अधिकची माहिती तुम्ही इंडिगो च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन घेऊ शकणार आहात आणि या माहिती द्वारे तुम्हीदेखील तुमचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात.