Ration Card ekyc Maharashtra राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक अर्थातच रेशनिंग कार्ड धारकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी असणार आहे कारण आता जवळपास दीड कोटी नागरिकांचे रेशनिंग बंद केले जाण्याची दाट शक्यता आहे कारण वारंवार सरकारकडून मुदतवाढ देऊन देखील अनेकांनी आपली रेशनिंग केवायसी केली नाही.
Ration Card KYC 2025
मित्रांनो शिधापत्रिकाधारकांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू मोफत दिले जातात यामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्डधारक असणाऱ्यांना त्यासोबत ज्यांचे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांचे देखील अटी व निकष सह त्यांना देखील हा लाभ दिला जातो.
सरकारद्वारे सर्व शिधापत्रिका धारकांना ही केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते परंतु अजूनही अनेक राज्यभरातील नागरिक आहेत की ज्यांनी आपली रेशनिंग कार्ड ची केवायसी केली नाही आणि ही केवायसी पूर्ण न झाल्याने त्यांना आता अपात्र करून योजनेअंतर्गत पुढील लाभ म्हणजेच की रेशनिंग धान्य दिले जाणार नाही.
Ration Card ekyc Maharashtra Online
आताही रेशनिंग कार्ड ची केवायसी तुम्ही कुठे करू शकता का देखील प्रश्न अनेक नागरिकांना आहे तर यासाठी तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुमची केवायसी करून घेऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन करायचे असल्यास मेरा रेशन या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमची रेशनिंग करायची केवायसी करून घेऊ शकता.
आता जे नागरिक आपली रेशनिंग कार्डची केवायसी करणार नाहीत अशा सर्वांचे अन्नधान्य आता बंद केले जाणार आहे. रेशनिंग कार्ड केवायसी करण्यासाठी सरकारकडून वारंवार मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे कारण जास्तीत जास्त नागरिकांनी आपली रेशनिंग कार्डची केवायसी करून मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा यासाठी सरकार वारंवार प्रयत्न करत आहे.
रेशनकार्ड योजना KYC अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
