१9 ते २५ एप्रिल: महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा; गारांचाही इशारा पहा!

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यातील हवामानात मोठी उलथापालथ होणार आहे. शेतीकामे आणि लग्नसराईचा हंगाम असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

१. पावसाचे संभाव्य वेळापत्रक

तारीखप्रभावित क्षेत्रपावसाचे स्वरूप
१८ व १९ एप्रिलकोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, नांदेड, नाशिकविजांचा कडकडाट आणि मध्यम पाऊस.
२० एप्रिलविदर्भ व मराठवाडा: अकोला, अमरावती, नागपूर, बीड, परभणी, धाराशिव‘ऑरेंज अलर्ट’ – मोठ्या प्रमाणात गारपीट (Hailstorm) होण्याची शक्यता.
२१ एप्रिलकन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफ्राबाद, छत्रपती संभाजीनगरदुपारनंतर किंवा रात्री अचानक पावसाच्या सरी.
२२ ते २५ एप्रिलदक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भाग

२. बळीराजा आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खालील खबरदारी घ्या:

  • कांदा उत्पादक: काढलेला कांदा सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने नीट झाकून ठेवा.
  • फळबागा: आंबा, द्राक्षे आणि संत्रा बागायतदारांनी गारांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • विजेपासून संरक्षण: वादळ सुरू असताना झाडाखाली, इलेक्ट्रिक खांबाजवळ किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका.
  • लग्नाचे नियोजन: ज्यांच्याकडे २१ एप्रिल दरम्यान विवाह सोहळे आहेत, त्यांनी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करावी.

हे पण वाचा:
नमो शेतकरी योजना : ४००० रुपये जमा, लाभार्थी यादी जाहीर; असे तपासा आपले नाव

Leave a Comment