मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू; येथे अर्ज करा लगेच भांडी मिळणार

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ‘गृहपयोगी वस्तू संच’ (भांडी कीट) वाटप योजना पुन्हा सक्रिय केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश स्थलांतरित होणाऱ्या कामगारांना संसारोपयोगी साहित्याची मदत करणे हा आहे.

१. योजनेचा लाभ आणि कीटमधील वस्तू

या योजनेअंतर्गत कामगारांना ३० वस्तूंचा संच मोफत मिळतो. यामध्ये खालील प्रमुख वस्तूंचा समावेश आहे:

  • ताट व वाट्या: ४ ताट, ८ वाट्या आणि ४ पाण्याचे ग्लास.
  • स्वयंपाकाची भांडी: १ कढई (स्टील), ५ लिटरचा स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर, पातेली (झाकणासह).
  • इतर साहित्य: परात, पाण्याचा जग (२ लिटर), मसाला डब्बा, मोठे चमचे आणि विविध आकाराचे डबे (१४, १६, १८ इंच).

२. पात्रतेचे निकष

  • नोंदणी: अर्जदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत (Active) कामगार असावा.
  • अनुभव: कामगाराने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • रहिवासी: अर्जदार महाराष्ट्राचा १५ वर्षांपासूनचा रहिवासी असावा.
  • वय: कामगाराचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.

३. आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगार नोंदणी कार्ड (Red Book).
  • आधार कार्ड आणि बँक पासबुक.
  • ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

४. अर्ज कसा करायचा?

१. ऑनलाइन पद्धत: मंडळाच्या अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जाऊन लॉगिन करा. २. फॉर्म भरणे: ‘गृहपयोगी वस्तू संच’ योजनेचा अर्ज निवडा आणि त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक व कुटुंबाची माहिती भरा. ३. पडताळणी: अर्ज भरल्यानंतर संबंधित सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी होईल. ४. वाटप: पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला ठरवून दिलेल्या कालावधीत जिल्हा कार्यालयामार्फत भांडी कीटचे वाटप केले जाईल.

हे पण वाचा:
आई कर्ज योजना २०२६: महिला उद्योजकांसाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; अशी आहे अर्ज प्रक्रिया

Leave a Comment