दहावीचा निकाल जाहीर; निकाल पाहण्यासाठी लिंक जाहीर, येथे पहा SSC Result Direct Link 2026

महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी सकाळी 11:30 वाजता ऑनलाईन जाहीर केला जात आहे. राज्यातील सर्व ९ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी प्रसिद्ध होईल.

दुपारी १ वाजता खालीलपैकी कोणत्याही लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात:

  1. mahresult.nic.in
  2. sscresult.mahahsscboard.in
  3. sscresult.mkcl.org
  4. results.digilocker.gov.in
  5. mahahsscboard.in

दहावीचा निकाल ऑनलाईन कसा तपासायचा? (Step-by-Step)

निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

हे पण वाचा:
कर्मचारियों और पेंशनर्स के लिए डबल खुशखबरी! 8वें वेतन आयोग पर आई बड़ी अपडेट; सितंबर में बढ़ेगा डीए
  • स्टेप १: वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • स्टेप २: होमपेजवर ‘SSC Examination Result March 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप ३: आता तुमचा Seat Number (परीक्षा क्रमांक) आणि आईचे नाव (Mother’s Name) अचूक टाइप करा.
  • स्टेप ४: ‘Submit’ किंवा ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
  • स्टेप ५: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट काढा किंवा पीडीएफ सेव्ह करा.

निकालानंतरच्या महत्त्वाच्या बाबी

१. गुण पडताळणी (Verification): जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, तर ९ मे २०२६ पासून तुम्ही विषयनिहाय गुणांच्या पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

२. मूळ गुणपत्रक: ऑनलाईन मिळालेले गुणपत्रक हे तात्पुरत्या स्वरूपाचे असेल. विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक (Original Marksheet) संबंधित शाळांमध्ये काही दिवसांनंतर वाटले जाईल, ज्याची तारीख बोर्ड लवकरच जाहीर करेल.

यंदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

यावर्षी राज्यभरातून सुमारे १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी राज्याचा निकाल ९३.०४ टक्के लागला होता. यंदा हा टक्का वाढणार की घटणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये लागून राहिली आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत बोर्डाचे सचिव विभागवार टक्केवारी आणि गुणवंतांची माहिती जाहीर करतील.

हे पण वाचा:
कर्जमाफीचा नवीन जीआर आला; ‘या’ शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी; थेट खात्यात जमा होणार पैसे

सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!

मोबाईल वरून जमीन मोजणी कशी करायची? संपूर्ण माहिती पहा

Leave a Comment