लाडक्या बहिणींनो, आता पुन्हा ई-केवायसी करावी लागणार?- नवीन शासन निर्णय पहा Ladki Bahin Yojana e-KYC 2026

नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो, मैत्रिणींनो आणि सर्वात लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

योजनेचा लाभ नियमित सुरू राहण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यामध्ये ज्यांनी आधी केवायसी केली होती, ज्यांची केवायसी राहिली होती किंवा ज्यांच्या केवायसीमध्ये काही त्रुटी होत्या, त्या सर्वांनाच आता पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे. ही केवायसी का करावी लागणार आहे, कोणाला ₹६,००० चा थकीत हप्ता एकत्र मिळणार आहे आणि अर्जाची स्थिती (Status) कशी तपासायची, याची संपूर्ण पोलखोल आज आपण या लेखात करणार आहोत!

दरवर्षी जून-जुलै महिन्यात केवायसी करणे बंधनकारक!

लाडकी बहीण योजनेच्या २०२५ मधील मूळ शासन निर्णयानुसार (GR), या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा:
बांधकाम कामगारांना मिळणार २ लाख रुपय ‘हा’ फॉर्म असा भरा Bandhkam Kamgar Yojana

त्यामुळे “आम्ही तर गेल्या वर्षीच केवायसी केली होती, आता कशाला करायची?” अशी चूक अजिबात करू नका. ही वार्षिक पडताळणी आहे, जी दरवर्षी करावीच लागणार आहे. जर तुम्ही या जून-जुलै महिन्यात केवायसी केली नाही, तर तुमचे पुढील हप्ते कायमचे बंद होऊ शकतात.

कोणाला मिळणार एकत्र ₹६,००० रुपये?

अनेक पात्र महिलांचे मागील काही हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा केवायसी प्रलंबित (Pending) असल्यामुळे थांबले होते.

  • थकीत हप्ते: ज्या महिला पात्र असूनही त्यांचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे २०२६ चे हप्ते रखडले होते, अशा महिलांना आता केवायसी दुरुस्त करताच एकत्र ₹६,००० रुपयांचा निधी बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.
  • मे महिन्याचा हप्ता: सध्या बहुतांश महिलांचा मे महिन्याचा हप्ता प्रतीक्षित असून, तो या जून महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढील काही दिवसांत बँक खात्यात येणे अपेक्षित आहे.

अर्जाची स्थिती (Status) तपासण्यात अडचणी का येत आहेत?

बऱ्याच लाडक्या बहिणी सध्या आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी अधिकृत पोर्टलवर (ladkibahin.maharashtra.gov.in) जात आहेत. पण तिथे एक मोठी अडचण आहे:

हे पण वाचा:
रेशन कार्ड धारकांनो! लगेच ई-केवायसी करा, अन्यथा धान्य होईल बंद; मोबाईलवरून करा २ मिनिटात Ration Card e-KYC 2026
  • नारी शक्ती दूत ॲपचे अर्ज: ज्या महिलांनी सुरुवातीला ‘नारी शक्ती दूत’ ॲपवरून अर्ज भरले होते, त्यांच्या अर्जाची अचूक स्थिती सध्या पोर्टलवर सहजासहजी पाहायला मिळत नाहीये.
  • माहिती कोणाकडे आहे? तुमचा हप्ता का थांबला, तुमच्या अर्जात काय त्रुटी आहे किंवा तुम्हाला अपात्र का केले, याचा सर्व डेटा सध्या सरकारकडे उपलब्ध आहे, पण तो अजून पोर्टलवर पूर्णपणे लाईव्ह झालेला नाही. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी पडून स्वतःचे लॉगिन आयडी-पासवर्ड चुकीच्या ठिकाणी टाकू नका, अन्यथा पैसे येणे बंद होईल!

या नवीन केवायसी विंडोचा कोणाला फायदा होईल?

लवकरच केवायसीची नवीन विंडो ओपन होणार असून यामुळे खालील ३ प्रकारच्या महिलांना मोठा फायदा होईल: १. अगोदर केवायसी केलेल्या महिला: त्यांना नियमानुसार त्यांचे वार्षिक नूतनीकरण (Annual Renewal) करता येईल. २. त्रुटी असलेल्या महिला: ज्यांच्याकडून आधी चुकीचे पर्याय निवडले गेले होते, त्यांना आपली चूक सुधारता येईल. ३. नवीन/राहिलेल्या महिला: ज्यांची केवायसी पूर्णपणे बाकी होती, त्यांना नवीन संधी मिळेल.

निष्कर्ष आणि आमचा प्रामाणिक सल्ला

बहिणींनो, ही योजना एकदा सुरू झाली की बंद होणार नाही, त्यामुळे नवनवीन अपडेट्स येतच राहणार आहेत. जशी ही केवायसीची लिंक अधिकृतपणे पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तसा त्याचा थेट व्हिडि सोबतचा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सोपा मार्ग आम्ही आमच्या चॅनल आणि ब्लॉगवर घेऊन येऊ.

हे पण वाचा:
केंद्रीय कर्मचारियों के लिए बड़ी खुशखबरी! 8वें वेतन आयोग पर आई बड़ी अपडेट, जानें कितनी बढ़ेगी आपकी सैलरी?

Leave a Comment