जय शिवराय मित्रांनो! जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने कमाई करू इच्छिणारा ‘लाडकी बहीण’ असाल, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय जीवन विमा निगम (LIC) कडून महिलांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीने फक्त महिलांसाठी ‘एलआयसी बीमा सखी’ (LIC Bima Sakhi Recruitment 2026) म्हणजेच ‘महिला करिअर एजंट’ (MCA) या विशेष योजनेची भरती सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना घरबसल्या किंवा आपल्या भागात काम करून दरमहा ₹५,००० ते ₹७,००० पर्यंत फिक्स स्टायपेंड आणि सोबत अतिरिक्त कमिशन कमावण्याची संधी मिळत आहे. ही योजना नक्की काय आहे, पात्रता काय आणि मोबाईलवरून ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? याची संपूर्ण ‘ए टू झेड’ (A to Z) माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. ‘एलआयसी बीमा सखी’ योजना नक्की काय आहे?
ही महिलांसाठी असणारी एक स्टायपेंडरी (Stipendary) योजना आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तीन वर्षांपर्यंत दरमहा ठराविक मानधन (Stायपेंड) दिले जाईल.
- हे काम पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा एजंट स्वरूपाचे असेल, म्हणजे तुम्ही सॅलरी एम्प्लॉय (कायमस्वरूपी पगारी नोकर) नसून स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम कराल.
- नक्की काय काम करायचं? तुम्हाला एलआयसीच्या वतीने ग्राहकांना पॉलिसी समजावून सांगून महिनाभरात कमीत कमी २ आणि वर्षाला २४ पॉलिसी (Number of Lives) पूर्ण करायच्या आहेत.
२. दरमहा किती पैसे (स्टायपेंड) मिळणार?
या तीन वर्षांच्या योजनेत वर्षागणिक तुमचे मानधन खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
- पहिले वर्ष: प्रत्येक महिन्याला ₹७,००० स्टायपेंड + २४ पॉलिसी यशस्वी पूर्ण केल्यास वर्षाच्या शेवटी ₹४८,००० अतिरिक्त बोनस!
- दुसरे वर्ष: प्रत्येक महिन्याला ₹६,००० स्टायपेंड (पहिल्या वर्षाच्या टार्गेटच्या ६५% परफॉर्मन्स टिकवणे आवश्यक).
- तिसरे वर्ष: प्रत्येक महिन्याला ₹५,००० स्टायपेंड (६५% परफॉर्मन्स टिकवणे आवश्यक).
३. आवश्यक पात्रता आणि अटी (Eligibility)
- वय मर्यादा: महिलांचे वय कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ७० वर्षे दरम्यान असावे.
- शैक्षणिक पात्रता: महिला किमान १० वी पास असणे अनिवार्य आहे.
- महत्त्वाची अट: जर तुमच्या घरात आधीपासूनच कोणी एलआयसी एजंट किंवा एलआयसी कर्मचारी असेल (पती, स्वतःची मुले), तर त्यांच्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. तसेच एलआयसीचे निवृत्त कर्मचारीही यात अर्ज करू शकत नाहीत.
४. आवश्यक कागदपत्रे (Documents List)
निवड झाल्यानंतर तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता भासेल:
- वयाचा पुरावा (वय आणि पत्त्यासाठी आधार कार्ड – सेल्फ अटेस्टेड/स्वाक्षरी केलेली झेरॉक्स)
- शैक्षणिक योग्यतेचा पुरावा (१० वी पास गुणपत्रिका/प्रमाणपत्र)
- नवीनतम पासपोर्ट साईज फोटो (ऑनलाईन अपलोड करण्यासाठी)
५. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑनलाईन अर्ज कसा करावा?
अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता:
- वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत पोर्टलवरील licindia.in/LIC-As-Bima-Sakhi या लिंकवर जा.
- बेसिक माहिती भरा: “Click Here for Bima Sakhi” या बटनावर क्लिक केल्यावर एक नवीन फॉर्म ओपन होईल. तिथे अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव आणि जन्मतारीख (जशी आधार कार्डवर आहे तशीच) अचूक भरा.
- संपर्क तपशील: तुमचा चालू मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि तालुक्यासह संपूर्ण पत्ता व पिनकोड भरा.
- कर्मचारी स्टेटस: तुम्ही आधीच एलआयसीचे एजंट किंवा कर्मचारी आहात का? या पर्यायावर ‘NO’ वर क्लिक करा आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून ‘Submit’ करा.
- राज्य आणि शहर निवड: पुढील पेजवर तुमचे राज्य (Maharashtra) निवडा, नंतर ‘Click for City’ वर क्लिक करून तुमच्या जवळचे किंवा कामाचे शहर निवडा.
- ब्रांच निवड (Branch List): तुमच्या शहरात असलेल्या एलआयसीच्या शाखांमधून तुम्ही कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त ३ शाखा (Branch) निवडू शकता. शाखा निवडल्यानंतर ‘Submit Lead Form’ वर क्लिक करा.
अर्ज केल्यानंतर पुढे काय होणार?
फॉर्म यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर स्क्रीनवर ‘Thank you for your interest… Our representative will contact you shortly’ असा मेसेज येईल.
काही दिवसांनंतर तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेकडून (Branch) तुम्हाला अधिकृत कॉल येईल. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला पुढील ट्रेनिंग व कामाचे स्वरूप समजावून सांगितले जाईल.
⚠️ महत्त्वाची चेतावणी (Fraud Alert): एलआयसी या भरतीसाठी किंवा प्रशिक्षणासाठी तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाही. त्यामुळे कोणी फोनवर पैशांची मागणी केल्यास फसव्या कॉल्सना बळी पडू नका!
