लाडक्या बहिणींना, आता परत ई-केवायसी करावी लागणार! नवीन यादी जाहीर

नमस्कार लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहित आहे का? लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार आता सर्वच लाभार्थी महिलांना परत एकदा ई-केवायसी (e-KYC) करावी लागणार आहे.

जर तुम्ही ही ई-केवायसी केली, तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळत राहतील; अन्यथा तुमचा लाभ पूर्णपणे बंद केला जाऊ शकतो. या संदर्भातील नवीन नियम काय आहेत? जुन्या लाभार्थ्यांनी काय करावे? आणि चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांचे काय होणार? या सर्व प्रश्नांची सोपी उत्तरे आपण आजच्या लेखात सविस्तर पाहणार आहोत.

दरवर्षी ई-केवायसी करणे का अनिवार्य आहे? (काय सांगतो जीआर?)

शेतकरी आणि भगिनींनो, जुलै २०२५ मध्ये राज्य शासनाने या योजने संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला होता. त्या जीआरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, लाडकी बहीण योजनेचा अखंडित लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी ‘वार्षिक ई-केवायसी’ (Annual e-KYC) करणे बंधनकारक राहील.

हे पण वाचा:
Google Pay Personal Loan Apply: अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया अब घर बैठे आसानी से मिलेगा ₹10,000 से ₹8 लाख तक का लोन, जानें पूरी प्रक्रिया Google Pay Personal Loan Apply

जेणेकरून केवळ पात्र आणि गरजू महिलांपर्यंतच शासकीय निधी पोहोचू शकेल. ज्या महिला दरवर्षी ही प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांनाच लाभ मिळत राहील आणि उर्वरित महिला लाभापासून वंचित राहतील.

तुमच्या मनातील प्रमुख ३ प्रश्नांची सोपी उत्तरे:

प्रश्न १: आम्ही पूर्वी (गेल्या वर्षी) ई-केवायसी केली आहे, आम्हालाही परत करावी लागेल का?

उत्तर: होय! तुम्ही आधी ई-केवायसी केली असली, तरीही नवीन आर्थिक वर्षाच्या नियमांनुसार तुम्हाला २०२६ साठी पुन्हा एकदा ई-केवायसी करावी लागेल. ही प्रक्रिया जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या नवीन जीआरनुसार सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रश्न २: ज्या महिलांनी आधी ई-केवायसी केलीच नव्हती, त्यांना आता चान्स मिळेल का?

उत्तर: होय, नक्कीच! ज्या पात्र महिला तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीअभावी मागील वेळेस ई-केवायसी करू शकल्या नव्हती आणि परिणामी त्यांचा लाभ बंद झाला होता, अशा सर्व वंचित महिलांना पुन्हा ई-केवायसी करून आपला लाभ सुरू करून घेता येणार आहे.

हे पण वाचा:
मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरू; येथे अर्ज करा लगेच भांडी मिळणार

प्रश्न ३: ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे जे अपात्र झाले, त्यांचे काय?

उत्तर: मागील प्रक्रियेदरम्यान लाखो महिलांनी फॉर्म भरताना किंवा ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता. शासनाने दुरुस्तीसाठी वारंवार संधी देऊनही अनेक बहिणींची दुरुस्ती बाकी राहिली होती. अशा सर्व भगिनींना या आगामी नवीन प्रक्रियेमध्ये आपली चुकीची ई-केवायसी दुरुस्त करून पुन्हा एकदा पात्र होण्याची शेवटची संधी दिली जाणार आहे.

नवीन ई-केवायसी कधीपासून सुरू होणार?

शासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जून २०२६ च्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारमार्फत अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल. जसा नवीन शासन निर्णय (GR) प्रसिद्ध होईल, तशी त्याची सर्वात पहिली अपडेट आणि अचूक ऑनलाईन लिंक आपल्या चॅनलवर आणि ब्लॉगवर दिली जाईल.

महत्त्वाचा सल्ला: मागील वेळी आपल्या चॅनलवरील अचूक व्हिडिओ पाहून लाखो महिलांनी अवघ्या २ ते ३ मिनिटांत स्वतःच्या मोबाईलवरून अचूक ई-केवायसी केली होती आणि त्यांना आजपर्यंत नियमित पैसे मिळत आहेत. त्यामुळे कोणत्याही खोट्या किंवा चुकीच्या लिंकवर जाऊन आपली माहिती भरू नका. अधिकृत आणि अचूक व्हिडिओ पाहूनच आपली ई-केवायसी पूर्ण करा.

हे पण वाचा:
सरकार महिलाओं को 5 लाख रुपए दे रही है; पूरा एप्लीकेशन प्रोसेस देखें PMEGP Aadhar Card Loan

निष्कर्ष: लाडकी बहीण योजनेचा लाभ निरंतर चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे शासनाचे आदेश येताच आपली पडताळणी वेळेत पूर्ण करून घ्या.

Leave a Comment