लाडक्या बहिणींची कडक चौकशी होणार त्यानंतरच मिळणार लाडकीला मे हफ्ता ? Ladki Bahin May hafta Yadi

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin May hafta Yadi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत मागील काही दिवसां पासून विविध प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आपल्यासमोर येत आहेत योजनेमध्ये सध्या अनेक अशा महिला सापडत आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेअंतर्गत लाभ घेतला आहे.

योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या स्वतः सरकारी नोकरदार आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे आणि तरी देखील त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना मिळतात म्हणूनच आता योजनेमध्ये लाडक्या बहिणींची खडक चौकशी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यामुळे अनेक महिला योजनेमध्ये बाद होणार आहेत आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

लाडकी बहिण योजना पडताळणी सुरु :

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता अनेक लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणीची प्रक्रिया सुरू असून यामध्ये सर्व अटी व निकषांची चौकशी केली जात आहे आणि यामध्ये अटी व निकषांमध्ये पात्र नसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Mahina Hafta लाडकीचा हफ्ता कुठे अडकला.. जून महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार ? Ladki Bahin June Mahina Hafta

कारण या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बहिणींमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर बोजा पडत आहे आणि यामुळे अशा अनेक महिला आहेत की ज्या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना योजनेचा अर्ज करता येत नाही आहे आणि म्हणूनच आता अशा सर्व महिलांची कडक चौकशी महिला व बाल विकास विभाग आणि राज्य सरकार द्वारे सुरू आहे.

लाडकी बहिण या सर्व बाबी तपासल्या जाणार :

लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौकशी बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे द्वारे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या महिला योजनेच्या शासन निर्णयानुसार त्यांना अटी अथवा निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना आता या योजनेमधून पुढील मिळणार नाही. Ladki Bahin May hafta Yadi

तसेच जानेवारीपासूनच योजनेमध्ये अनेक महिलांची तपासणी सुरू आहे आणि महिलांना बाद देखील केले जात आहे. ही योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी असल्याचे देखील यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास अथवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अशा लाडक्या बहिणींना देखील यापुढे योजनेअंतर्गत पैसे दिले जाणार नाही.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment लाडकी बहिण हफ्ता वितरण आज शेवटचा दिवस या जिल्ह्यातील महिलांना पैसे येणार | Ladki Bahin June Installment

तसेच परिवहन विभागाकडून चार चाकी वाहनांबद्दल देखील सर्व डेटा सरकार घेत आहे आणि यामध्ये चार चाकी वाहनधारक असल्यास संबंधित कुटुंबातील महिलेला देखील योजनेमध्ये पुढील हप्ते मिळणार नाहीत.

लाडकी बहिण मे हफ्ता कधी येणार ?

यामुळे ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे कारण संपूर्ण मे महिना संपला जून महिना देखील सुरू झाला तरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले नाही.

आता काही ठिकाणी असे देखील बोलले जात आहे की योजनेमधून संपूर्ण चौकशीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतरच योजनेचा मे महिन्याचा हप्ता फक्त पात्र महिलांच्या बँकेची वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे देखील बोलले जात आहे. आता याबद्दल पुढील कोणतेही अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे त्यामुळे आपला व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन करून घ्या.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date लाडकी बहिण जून हफ्ता आज या जिल्ह्यात होणार वाटप जमा होणार 1500 रुपये : Ladki Bahin June Installment Date
Ladki Bahin May hafta Yadi

Leave a Comment

Join Whatsapp Group !