सरकार देत आहे शेतकऱ्यांना 05 लाख अनुदान मागेल त्याला विहीर लगेच करा अर्ज | Vihir Anudan 2025 Maharashtra

WhatsApp Group Join Now

Vihir Anudan 2025 Maharashtra राज्यभरात ही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा साठा अथवा पाण्याची उपलब्धता करण्यासाठी बरेचदा पावसावर अवलंबून राहावे लागते, अशा वेळेस पाऊस पडल्यानंतर त्या पाण्याचा साठा असेल किंवा त्या पाण्यासाठी स्त्रोत निर्मिती करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर असणे साहजिकच असते कारण विहीर पाडून जमिनीच्या अंतर्गत असलेल्या पाण्याचा लाभ घेऊन आपल्या शेतजमिनी मधील पिकांसाठी शेतकरी नेहमीच पाणी देत असतो.

परंतु विहीर खोदायची म्हटल्यास त्यासाठी देखील आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी गरजेचा असतो आणि त्यामुळेच अनेक अल्पभूधारक शेतकरी असतात किंवा कोरडवाहू भागातील शेतकरी यांच्याकडे या निधीची कमतरता असल्याने विहीर खोदायला देखील अडचणी येतात. यावर आता राज्य सरकार द्वारे तोड काढून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दलचीच माहिती पाहूया.

मागेल त्याला विहीर योजना महाराष्ट्र 2025

शेतकरी मित्रांनो विहीर खोदण्यासाठी सरकार तुम्हाला 05 लाख रुपये अनुदान देत आहे या योजने साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेच्या अंतर्गत सदरील योजना राबवली जाते आणि यासाठी पूर्वी 04 लाख रुपये अनुदान दिले जात होते परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून यापुढे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 05 लाख रुपये दिले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Namo Shetkari Next Installment Date राज्यातील शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार 4000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का लगेच पहा | Namo Shetkari Next Installment Date

या निर्णयाचे स्वागत शेतकरी वर्गातून होत आहे आणि आपल्या शेतात विहीर खोदून त्यामधून सिंचनाची सुविधा शेतकऱ्यांना निर्माण करता येणार आहे आणि त्यामुळे सिंचनाखाली असलेले शेतजमीन देखील आता वाढणार आहे. या योजनेसाठी आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन सरकारकडून केले जात आहे.

सरकार कडून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान

आता ही योजना कुठे लागू असणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या गावांमध्ये मनरेगाच्या माध्यमातून काम सुरू आहेत अशा गावांमध्ये योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे निश्चित करावे लागणार आहे की तुमच्या गावामध्ये मनरेगाचे काम सुरू आहे की नाही. Vihir Anudan 2025 Maharashtra

त्यासोबतच ही योजना विविध सामाजिक आणि आर्थिक गटातील शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे आणि अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी असतील भटक्या जाती व विमुक्त जमातीमध्ये कुटुंब असतील, बीपीएल कार्डधारक असतील, इंदिरा आवास योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या असतील, महिला अथवा दिव्यांग करता असलेली कुटुंब असतील आणि अल्पभूधारक शेतकरी असतील यांचा समावेश आहे थोडक्यात आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या आणि गरजू असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana Loan Scheme

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व निकष

  • योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 01 एकर सलग जमीन असणे आवश्यक असणार आहे.
  • सदरील जमिनीवर याआधी कोणत्याही प्रकारची विहीर नोंदलेली नसावी.
  • दोन विहिरींमध्ये 250 मीटर अंतर असणे देखील आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे जॉब कार्ड बंदरकारक असणार आहे.
  • तसेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून तुमच्या विहिरीचे अंतर हे किमान 500 मीटर असावे.
  • या सर्व अटीमध्ये पात्र असल्यास तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत अथवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकणार आहात.Vihir Anudan 2025 Maharashtra
Vihir Anudan 2025 Maharashtra

Leave a Comment

Join Whatsapp Group !