Free Bhandi Set Yojana Maharashtra 2025 राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण मागील अनेक दिवसांपासून बांधकाम कामगार ज्या योजनेची वाट पाहत होते अर्थातच मोफत भांडी सेट कधीपासून वाटप सुरू होणार त्यासाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून स्वीकृत केली जाणार असे अनेक प्रश्न बांधकाम कामगारांचे होते आणि आता सर्व बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता मोफत भांडी सेट मिळवण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटप सध्या सुरू आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या अर्ज करण्यासाठी ची लिंक देखील तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे अर्ज करण्यापूर्वी काही बाबींची तुम्हाला माहिती असणे आवश्यक असणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही आधी या योजनेअंतर्गत भांडी सेट लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा हा संच मिळणार नाही.
Mofat Bhandi Set Yojana 2025
तुमच्या अर्जाचे नूतनीकरण झाले नसल्यास तरीदेखील तुम्ही या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकत नाही कारण जे ऍक्टिव्ह बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठीच हा भांडी संच असणार आहे आणि म्हणून तुम्ही या अटी व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत हे अर्ज करण्यासाठी सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आलेली आहे.
आता योजनेसाठी तुमचा अर्ज कसा करायचा त्यासोबतच भांड्यांचे वाटप कधी होणार कागदपत्र कोणती लागणार आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकणार आहात.Free Bhandi Set Yojana Maharashtra 2025
Bhandi Set Yojana 2025 Apply Online
बांधकाम कामगार मोफत भांडी संच योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे :
- यासाठी सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी विचारलेली माहिती जसे की सर्वात महत्त्वाचे असणारे म्हणजे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे.
- नोंदणी क्रमांक टाकून झाल्यानंतर नोंदणी दिनांक त्यासोबतच नूतनीकरण केलेला दिनांक देखील तुम्हाला टाकायचा आहे.
- मोबाईल नंबर असेल आधार नंबर असेल आणि त्यासोबतच वैयक्तिक माहिती जसे की नाव असेल आडनाव असेल या संदर्भातील माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे.
- माहिती भरल्यानंतर तुम्ही जो जिल्हा निवडाल त्या जिल्ह्यामधील ज्या ज्या ठिकाणी ही भांडी संच वाटण्याची शिबिर आहेत ती सर्व शिबिरांची नावे आणि यादी तुम्हाला दिसणार आहे.
- यामध्ये तुमच्या जवळील अथवा तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते शिबिर तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता आणि शिबिर निवडल्यानंतर कोणत्या तारखेला जाऊन तुम्हाला हा भांडी संच घ्यायचा आहे यासाठी देखील तुम्हाला तारीख निवडायचे आहे.
- तारीख निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असा पर्याय दिसणार आहे त्या पर्यायावर क्लिक करून हा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढायचे आहे आणि या प्रिंट वरती सर्व माहिती भरून तुम्हाला त्यावर सही करायची आहे आणि सही केल्यानंतर पुन्हा एकदा हा फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे.
- सर्व सविस्तर माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायचे आहे आणि ही प्रिंट काढल्यानंतर त्यावर तुमचे शिबिराचा पत्ता असणार आहे दिनांक तुम्ही निवडलेला असणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे या फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या शिबिराला जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचा भांडी संच तुम्हाला दिला जाणार आहे.Free Bhandi Set Yojana Maharashtra 2025

भांडीसेट योजना अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |