Free Scholarship Girls Maharashtra 2025 नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल नेहमीच मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असलेले आपण पाहत असतो. मुलींना उत्तम शिक्षण मिळावे त्यासोबतच मुली या स्वतःच्या पायावर उभा रहाव्यात यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवून मुलींना उत्तम शिक्षण देण्याचे ध्येय नियमित सरकारचे पाहायला मिळाले आहे.
शिक्षणाचा खर्च अनेक गरीब कुटुंबांना, मुलीच्या पालकांना बरेचदा परवडत नसतो आणि त्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप योजना देखील राबवल्या जातात परंतु या योजना बद्दलची माहिती अनेक कुटुंबीयांना किंवा पालकांना नसते अशाच महत्त्वाच्या असणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणाऱ्या 05 स्कॉलरशिप योजना बद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत.
Maharashtra Scholarship Yojana for Girls 2025
1.उडान स्कॉलरशिप : उडान स्कॉलरशिप ही सीबीएसई बोर्ड मध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते जेणेकरून सदरील मुलींना अथवा विद्यार्थिनींना त्यांच्या इंजीनियरिंग अथवा अभियंता क्षेत्रांमध्ये तयारीसाठी ही आर्थिक मदत त्यांना दिली जाते जेणेकरून मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळावे आणि या स्कॉलरशिप मध्ये राखीव प्रवर्गातील मुलींसाठी जागा शिल्लक असतात.
प्रगती स्कॉलरशिप योजना (Pragati Scholarship Yojana)
प्रगती स्कॉलरशिप ही योजना देखील मुलींसाठी दिली जाते ज्या मुलींनी AICTE मान्यताप्राप्त असलेल्या कॉलेजमध्ये डिप्लोमा अथवा डिग्री साठी ऍडमिशन घेतलेले आहे अशाच मुलींसाठी ही स्कॉलरशिप योजना असते आणि यामध्ये सदरील मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 08 लाखांपेक्षा कमी असणे देखील आवश्यक असते.Free Scholarship Girls Maharashtra 2025
इंदिरा गांधी स्कॉलरशिप योजना (Indira Gandhi Scholarship Yojana)
इंदिरा गांधी स्कॉलरशिप योजना ही योजना सिंगल चाइल्ड मुलींसाठीच असते, याचाच अर्थ या योजनेमध्ये ज्या घरामध्ये एकुलती एक मुलगी आहे त्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणत्याही नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्टमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांच्यासाठी या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप दिली जाते.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना (Savitribai Phule Scholarship Yojana)
स्कॉलरशिप योजना मधील सर्वात महत्त्वाची असलेली योजना म्हणजेच की सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना ही योजना मागासवर्गीय मुलींसाठी असते आणि या योजनेमध्ये इयत्ता आठवी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो आणि त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ही स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आणि राबवण्यात येत आहे.
बेगम हजरत महल National स्कॉलरशिप योजना
बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप योजना या योजनेअंतर्गत नववी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, सिख, पारसी आणि जैन समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्ट द्वारे दिली जाते.Free Scholarship Girls Maharashtra 2025
