Gharkul List 2025 Maharashtra राज्यातील सर्व गरीब आणि घर नसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
राज्यामध्ये सुमारे 30 लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात येणार असल्याने यामध्ये सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलची लाभार्थी यादी असेल किंवा सविस्तर ची माहिती आहे ते आपण घेणार आहोत.
Gharkul Labharthi Yadi 2025
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात करताना यामध्ये 2011 च्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाच्या आधारावर लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या यामध्ये जे सर्वेक्षण झाले त्यामध्ये घर विरहित म्हणून ओळखले गेले त्यांच्या आधारावर देशभरात लाभार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली मात्र या प्रक्रियेत अनेक घर विरहीत कुटुंबे वगळली देखील गेली होती.
यामुळे महाराष्ट्राबद्दल सुरुवातीला फक्त 13 ते 14 लाख कुटुंबांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती जी की वास्तविक राज्याची लोकसंख्या आणि घरकुलाच्या गरजेच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणामध्ये होते आणि म्हणूनच राज्य सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन केंद्र सरकारकडे हा मुद्दा मांडला होता.
यानंतर 2017 18 मध्ये राज्य सरकारचा ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सध्याची यादी अपुरी आहे आणि खरे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याने यावर पर्याय काढावा अशी विनंती देखील केंद्राकडे केली होती आणि त्यावर आवाज प्लस या नावाच्या योजनेने जन्म घेतला.Gharkul List 2025 Maharashtra
PM Aawas Yojana 2025 Maharashtra List
मित्रांना सध्या घरकुल 2025 चा सर्वे सुरू असून यामध्ये अर्जदारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन मधून देखील लाभार्थी आपले अर्ज करू शकतात आणि ज्यांना मोबाईल ॲप्लिकेशन म्हणून शक्य नाही ते ऑफलाईन अर्ज देखील भरू शकतात.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र पहिला कार्यक्रम घेतला होता आणि या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याकडून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये आवास प्लस च्या यादीमध्ये जी 30 लाख नावे आहेत या सर्वांना घरे देण्याची गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त घरांचे वाटप करा असे मागणी करण्यात आली होती आणि याचवेळी शिवराज सिंह चव्हाण यांच्या वतीने वीस लाख घरांचे वाटप जाहीर केले होते त्यापैकी दहा लाख घरकुलासाठी पहिला हप्ता देखील वर्ग करण्यात आला होता.Gharkul List 2025 Maharashtra
