Maharashtra Rain Forecast June 2025 मित्रांनो यावर्षी वेळ आधीच मान्सून दाखल झाला आणि संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. यावर्षी मे महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्येच राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्व ओढ्या, नद्या आणि नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वीला झालेल्या या पावसामुळे बळीराजा अर्थातच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे कारण आता सर्वत्र पाण्याची चिंता मिटली आहे.
परंतु हे असतानाच काही भागांमध्ये मात्र या पावसाने धुमाकूळ घातला आणि अजूनच नुकसान देखील झाले. शेतकऱ्यांचा कांदा असेल, द्राक्ष बागायतदार असतील, केळी बागायतदार असतील, टोमॅटो उत्पादक अशा विविध शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा देखील सामना करावा लागला.
आता जून महिन्यामध्ये पावसाची परिस्थिती काय असणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये कुठे पाऊस पडेल याबद्दलची माहिती आपण घेऊया.
Weather Update Maharashtra June 2025
मित्रांनो जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये अथवा 10 जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेणार असल्याचे चिन्ह आहेत. मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्याचे दर्शन होत आहे आणि त्यामुळे आता शेतकरी बांधव खरीप हंगामाच्या तयारीमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.
परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचे वारे, विजा आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये अतिशय सुरळीत ठिकाणी अगदी हलक्या स्तरींचा अंदाज देखील त्या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे. बंगालच्या उपसागरामधील कमी दा बाचे जमिनीवर आल्या असल्याने भारताच्या वायव्येकडे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
येथे चोवीस तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी हलक्याचे मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी कोणताही अलर्ट नसणार आहे.Maharashtra Rain Forecast June 2025
विदर्भातील या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता :
यवतमाळ, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा म्हणजेच की येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची अथवा जनावरांची काळजी घेण्याचे देखील आवाहन हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज अथवा येणाऱ्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे कमी प्रमाणात असणार आहे त्यामुळे त्या भागातील शेतकरी आता खरीप हंगामाच्या देखील तयारीस लागणार आहे.
