Namo Shetkari Yojana Next Hafta Date राज्यातील सर्व शेतकरी बांधव मागील अनेक दिवसांपासून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण जवळपास चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या दोन्ही योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचे वितरण झाले नाही आणि त्यामुळेच योजना सुरू आहे का नाही आम्हाला पुढील जे हप्ते आहेत ते मिळणार का नाही असा देखील प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
Namo Shetkari Samman Yojana 2025
मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी 2019 यावर्षीपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील अल्पभूधारक आणि अटीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वार्षिक सहा हजार रुपये आम्ही देणार असे जाहीर करण्यात आले.
योजना जाहीर झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी देखील तात्काळ करून लाभार्थी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कागदपत्रे घेऊन योजनेचे हप्ते दोन हजार रुपयाप्रमाणे तीन हप्ते असा लाभ जमा होण्यास सुरुवात झाली. आजवर योजनेअंतर्गत 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत. Namo Shetkari Yojana Next Hafta Date
PM Kisan Yojana Next Installment Date
पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवरच योजनेला अधिक बळकट करण्यासाठी व्यापक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे 2023 पासून नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान योजनेतील लाभार्थी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या निधीतून सुमारे सहा हजार रुपये वार्षिक देण्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे वेगळे अर्ज देखील मागवले गेले नाहीत आणि ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळतो त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ थेट देण्याचे जाहीर केले.
Namo Shetkari Samman Yojana Next Installment
पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा लाभ देखील डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनेफिशरी ट्रान्सफर याच्याद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले.
नमो शेतकरी योजना पुढील हफ्ता कधी येणार ?
आता राज्यभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या देखील पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील पुढचा हप्ता कधी येणार कारण जून महिन्यामध्ये पैसे येणार असे सांगितले होते परंतु आता जुलै महिना देखील निम्म्याहून जास्त संपला आहे आणि त्यामुळेच पैसे येणार का नाही असा देखील प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहे.
तर याबद्दल अधिक ची माहिती घेतली असता या दोनही योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख अद्याप ठरली नाही परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे बोलले जात आहे. ज्यावेळी या योजनांच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे त्यावेळी तुम्हाला सर्वात आधी आपल्या द्वारे माहिती मिळणार आहे त्यामुळेच तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला देखील विसरू नका त्याची लिंक देण्यात आली आहे.Namo Shetkari Yojana Next Hafta Date
लाभार्थी यादी pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनेच्या अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
