शेतीच्या वाटणीसाठी आता कोणतीही शुल्क नाही सरकारचा मोठा निर्णय लगेच पहा | Sheti Mudrank Shulk Mafi 2025

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्य शासनाने शेतीच्या वाटपासाठी लागणाऱ्या दस्त नोंदणी शुल्काला पूर्णतः माफ केलं आहे. या निर्णयामुळे शेतजमिनीच्या वाटणीसंदर्भातील प्रक्रिया आता आणखी सोपी आणि परवडणारी ठरणार आहे.

नोंदणी शुल्क रद्द – काय आहे निर्णय ?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, शेतीच्या वाटपासाठी तयार होणाऱ्या दस्तांवर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी साधारण ३०,००० रुपयांपर्यंत हे शुल्क भरावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना केवळ दस्तावेज तयार करण्याचा खर्च वगळता इतर कोणताही सरकारी शुल्क द्यावा लागणार नाही.

मे महिन्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळाने महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर लगेचच अधिसूचना जारी झाली असून, सध्या या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.Sheti Mudrank Shulk Mafi 2025

हे पण वाचा:
Mahajyoti Free Tablet 2025 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि सोबत 6GB इंटरनेट डेटा अर्जास मुदतवाढ : Mahajyoti Free Tablet 2025

मे महिन्यात घेण्यात आला निर्णय

मे महिन्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळाने महसूल विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर लगेचच अधिसूचना जारी झाली असून, सध्या या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

या निर्णयामुळे सरकारच्या महसूलात दरवर्षी अंदाजे 35 ते 40 कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबदल्यात लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, रखडलेली शेती वाटप प्रक्रिया आता जलद गतीने पूर्ण होऊ शकते.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार, शेती वाटप करताना मोजणी बंधनकारक आहे. यावेळी दस्तासाठी मुद्रांक शुल्क (केवळ 100 रुपये) आणि नोंदणी शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्क कमी असून, नोंदणी शुल्क मात्र मोठ्या प्रमाणात लागायचं. आता हे नोंदणी शुल्क रद्द झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.Sheti Mudrank Shulk Mafi 2025

हे पण वाचा:
Free Shilai Machine Yojana 2025 फ्री शिलाई मशीन योजना 90% अनुदान लगेच करा तुमचे अर्ज शेवटची संधी : Free Shilai Machine Yojana 2025

योजनेच्या अधिक माहितीसाठी – क्लिक करा

योजना ग्रुप जॉईन करा – क्लिक करा

Sheti Mudrank Shulk Mafi 2025

हे पण वाचा:
Free Bhandi Set Yojana 2025 फ्री भांडीसेट योजनेचा अर्ज अजूनही केला नाही ? आता शेवटची संधी मिळणार 30 प्रकारची भांडी | Free Bhandi Set Yojana 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !