मतदान कार्ड डाउनलोड करा फक्त १ मिनिटात; नवीन यादी जाहीर Voter ID Card

मित्रांनो! आजच्या डिजिटल युगात आता कोणतीही शासकीय कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज उरलेली नाही. जर तुमचे मतदान कार्ड (Voter ID Card) हरवले असेल, खराब झाले असेल किंवा तुम्हाला तातडीने त्याची गरज असेल, तर आता तुम्ही ते तुमच्या मोबाईलवरून अवघ्या एका मिनिटात डाऊनलोड करू शकता.

भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने (ECI) डिजिटल मतदार कार्ड म्हणजेच e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ओरिजिनल मतदान कार्ड कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे, याची ‘ए टू झेड’ (A to Z) माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. सर्वात आधी हे अधिकृत ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

  • तुमच्या मोबाईलमधील Google Play Store ओपन करा.
  • सर्च बॉक्समध्ये ‘ECI Net’ किंवा ‘Voter Helpline’ असे सर्च करा.
  • हे निवडणूक आयोगाचे अधिकृत सरकारी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करा.

२. ॲपमध्ये नवीन अकाउंट (Sign Up) कसे तयार करावे?

ॲप ओपन केल्यावर तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील, त्यातील ५ नंबरच्या Download e-Voter Card (e-EPIC)’ या पर्यायावर क्लिक करा.

हे पण वाचा:
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? ₹१५०० चा हप्ता का बंद झाला? तुमचे नाव पात्र यादीत आहे का? वाचा नवीन नियम
  • अकाउंट आधीच असेल तर: तुमचा मोबाईल नंबर टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि लॉग इन करा.
  • नवीन युझर असाल तर: खाली दिलेल्या ‘New User’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमचे पहिले नाव, आडनाव आणि आलेला ओटीपी (OTP) टाकून सबमिट करा. तुमचे अकाउंट यशस्वीरीत्या तयार होईल.

३. लॉगिन करून मतदार कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया

अकाउंट तयार झाल्यानंतर पुन्हा मुख्य पेजवर या आणि तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी टाकून Login करा.

  1. पर्याय निवडा: लॉगिन झाल्यानंतर पुन्हा Download e-Voter Card या बटनावर क्लिक करा.
  2. मतदान कार्ड नंबर टाका: आता समोर दिसणाऱ्या बॉक्समध्ये तुमचा EPIC Number (मतदान कार्ड क्रमांक) टाका.
  3. राज्य निवडा: खालील यादीतून आपले ‘Maharashtra’ (महाराष्ट्र) हे राज्य सिलेक्ट करा आणि ‘Fetch Details’ या बटनावर क्लिक करा.
  4. माहिती तपासा: स्क्रीनवर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मतदान केंद्र ही माहिती येईल. ती तपासून खाली दिलेल्या ‘Proceed’ बटनावर क्लिक करा.
  5. ओटीपी पडताळणी: तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर एक ओटीपी (OTP) पाठवला जाईल. तो ओटीपी बॉक्समध्ये अचूक भरा.
  6. डाऊनलोड करा: शेवटी ‘Verify & Download’ या बटनावर क्लिक करताच तुमचे ओरिजिनल डिजिटल मतदान कार्ड पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड होईल!

⚠️ सर्वात महत्त्वाची अट:

तुमचे डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुमचे कार्ड डाऊनलोड होणार नाही.

  • नंबर कसा लिंक करायचा? काळजी करू नका! मतदान कार्डला मोबाईल नंबर घरबसल्या कसा लिंक करायचा, यावर आपल्या ‘मराठी कॉर्नर’ YouTube चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ उपलब्ध आहे. तो व्हिडिओ पाहून आधी तुमचा नंबर लिंक करा आणि नंतर तुमचे कार्ड डाऊनलोड करा.

निष्कर्ष: डिजिटल स्वरूपातील हे ‘e-EPIC’ कार्ड सर्व शासकीय कामांसाठी पूर्णपणे वैध आणि अधिकृत मानले जाते. त्यामुळे आजच हे कार्ड डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवून घ्या.

हे पण वाचा:
लाडक्या बहिणींना पुन्हा पैसे वाटप सुरू; आता या महिलांच्या खात्यात जमा होणार ₹३,०००

Leave a Comment