लाडकी बहिण योजना सरकार कडून 2650 हून अधिक बहिणींची होणार वसुली | Ladki Bahin Fasavnuk 2025

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Fasavnuk 2025 लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्व लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असतानाच आता मात्र लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि यामुळे सर्व यंत्रणा खडाडून जागी झाली आहे. आता सर्व प्रशासन या संदर्भात काम करत असून यामध्ये मोठी कारवाई देखील केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता यामध्ये नक्की काय विषय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेतला सरकारी कर्मचारी महिलांनी :

लाडकी बहीण योजना संदर्भात बोलायचं झाल्यास या योजनेचा अर्ज करतेवेळी काही अटी व निकष देण्यात आले होते आणि अर्ज करतेवेळी महिलेकडून हमीपत्र देखील त्या ठिकाणी स्वाक्षरी करून घेतले होते. यामध्ये स्पष्टपणे सरकारी नोकरदार असणाऱ्या महिला, तसेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला अथवा महिलेचे कुटुंब, चार चाकी वाहनधारक कुटुंब असल्यास त्या कुटुंबातील महिला किंवा अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला या सर्व या योजनेसाठी पात्र नसणार हे स्पष्ट सांगितले होते. Ladki Bahin Apatra Yadi 2025

योजनेचा अर्ज करताना सर्व अटी माहित असून देखील अनेक महिलांनी या योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्या सर्व महिलांचा आता सरकार टप्प्याटप्प्याने लाभ बंद करत आहे.

हे पण वाचा:
Namo Shetkari Next Installment Date राज्यातील शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार 4000 रुपये यादीत तुमचे नाव आहे का लगेच पहा | Namo Shetkari Next Installment Date

परंतु या सर्वांमध्ये एक धक्कादायक आकडेवारी देखील आता समोर आली आहे. या आकडेवारीनुसार दोन दिवसांमध्ये 01 लाख 20 हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली असता त्यामध्ये तब्बल 2650 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.Ladki Bahin Fasavnuk 2025

सरकारी नोकरदार महिला घेतात महिना 1500 रुपये :

म्हणजेच की सरकारी नोकरी मधून महिन्याला तीस हजार चाळीस हजार काहींना तर 50 हजार रुपये एवढा पगार असताना देखील राज्यातील गरजू महिलांसाठी सुरू केलेला लाडकी बहीण योजनेच्या महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या लाभासाठी देखील या महिलांनी अर्ज केला आणि नुसता अर्ज केला नाही तर लाभ देखील घेतला.

या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर आता सरकार देखील वसुलीची कारवाई करणार आहे आणि या सर्व सरकारी नोकरदार आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी देखील आता संबंधित गाव असल्यास तहसील कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे आणि तिथूनच या सर्व लाडक्या बहिणीकडून पैशाची वसुली देखील कडक स्वरूपात केले जाणार असल्याचे देखील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Loan Scheme लाडकी बहिण 01 लाख रु.कर्ज या 16 लाख महिला पात्र लगेच पहा यादी | Ladki Bahin Yojana Loan Scheme

06 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी होणार :

या धक्कादायक आकडेवारी नंतर ज्या ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत अशा अनेक अर्जांची पुन्हा एकदा पडताळतनी केली जाणार असल्याची देखील माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेले आहे आणि यामध्ये तब्बल येत्या काही दिवसांमध्ये 06 लाख महिलांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी होणार आहे आणि त्यामधून ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेमधून बाद केले जाणार आहे.Ladki Bahin Fasavnuk 2025

Ladki Bahin Fasavnuk 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !