Ativrushti Anudan 2025 Maharashtra राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आणि त्यामुळेच सर्वाधिक जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शेतकऱ्यांचे काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची रान वाहून गेली. शेतामध्ये उभ असलेलं पीकदेखील संपूर्णपणे वाहून गेल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर नुकसान झाले आणि यामुळेच यामध्ये शेतकरी संपूर्णपणे कोलमडून गेला आहे.
या सर्वातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचे असल्यास त्यांना कोणत्याही पंचनामे न करता ज्या भागांमध्ये पाऊस झाला आहे तिथल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांच्या मतानुसार काल त्यांनी गांधी भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सरकारकडे या संदर्भातील मागणी केली आहे.
महाराष्ट्राला मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोडपे असून सलग दोन ते तीन आठवडे भाग बदलत बदलत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. काही भागातील शेतकऱ्यांसाठी जनावरांचा चारा देखील सध्या मिळत नाही आहे आणि त्यामुळेच आधीच शेतीमालाला भाव नसल्याने संकटात असलेला शेतकरी आता मात्र अजूनच जास्त संकटात गेला आहे. Ativrushti Anudan 2025 Maharashtra
राज्याच्या तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आज या नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात आहे आणि त्यामुळे सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असणार आहे. मे महिन्यामध्ये अनेक पिके हे काढणीला येत असतात आणि त्याचवेळी झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, डाळिंब बसेल, केळी फळबाग असेल आंबे असतील यासारख्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे
आणि अनेक भागांमध्ये जनावरांना चारा देखील मिळत नाही आहे. शेतकऱ्यांचे सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्याचा या संकटामुळे कोलमडून गेला आहे आणि त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी देखील अशा शेतकरी करत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे निकष न टाकता शेतकऱ्याला पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना भरीव मुदत द्यावी अशी देखील मागणी यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आणि या संकटाचा काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे अन्यथा शेतकरी आता अजून गेला आहे.

यासोबतच सरकारने निवडणुकां वेळी दिलेले आश्वासन म्हणजे आम्ही सरसकट कर्जमाफी करू हे आश्वासन देखील आता सरकारने पूर्ण करून राज्यभरातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी जेणेकरून शेतकरी सावरेल आणि या संकटाला तोंड देऊ शकेल असे देखील यावेळी बोलताना ते म्हटले.