Blogging Mhanje kay Marathi मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये अनेक गोष्टी अपडेट होत आहेत आणि त्यामधूनच विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे तर ए आय च्या तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणामध्ये रोजगारांमध्ये घट देखील होत आहे. आपल्याकडे अनेक सुशिक्षित विद्यार्थी अथवा बेरोजगार त्यासोबतच गृहिणी असलेल्या महिला या घरबसल्यात कामाच्या शोधात असतात.
अशा सर्वांसाठी एक सर्वोत्तम पर्याय म्हणजे ब्लॉगिंग ज्याला आपण वेबसाईट डेव्हलपमेंट असे देखील म्हणू शकतो. आता यासाठी काही शैक्षणिक पात्रता आवश्यक असते का किंवा गुगल तुम्हाला का पैसे देते या संदर्भातील माहिती आपण आज पाहणार आहोत.
ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय करायचे असते ?
मित्रांनो ब्लॉगिंग हा शब्द तरी आपल्याला वेगळा वाटत असला तरी यामध्ये असं काही नसतं की जे खूप अवघड आहे ब्लॉगिंग या शब्दाचा अर्थ आहे लेख. म्हणजेच की एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या स्थळाबद्दल ऐतिहासिक माहिती, विविध पाककलेच्या रेसिपी अशी सर्व किंवा तुम्हाला ज्या विषयाबद्दल माहिती लिहायची आहे ती माहिती तुम्ही गुगलवर पब्लिश करायची असते.
यासाठी तुमच्याकडे एक वेबसाईट असणे आवश्यक असणार आहे यासाठी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म असणार आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची वेबसाईट कोणत्याही कोडींग शिवाय अगदी सहजरीत्या बनवू शकता.
गुगल कडून पैसे कधी मिळतात ?
आता मग ही माहिती गुगलवर पब्लिश केली की तुम्हाला लगेच पैसे मिळण्यास सुरुवात होते का ? ? तर असे नसते यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती लिहायला लागते त्यानंतर तुमची वेबसाईट गुगलवर दिसायला सुरुवात होते आणि एक चांगली वेबसाईट अथवा तुम्ही त्यामध्ये चांगल्या पद्धतीने माहिती दिल्यास तुम्हाला गुगल ऍडसेन्स या कंपनीकडून तुमचे वेबसाईट साठी अप्रुव्हल मिळतं.
हे अप्रूवल मिळाल्यानंतर तुमच्या वेबसाईटवर जाहिराती दिसायला सुरुवात होते या जाहिराती गुगलच तुमच्या वेबसाईटवर टाकत असते आणि या जाहिराती दिसायला सुरुवात झाल्यानंतर गुगल तुम्हाला या जाहिरातीसाठी पेमेंट देत असते. हीच सेम प्रक्रिया youtube साठी देखील असते युट्युब मध्ये देखील तुम्हाला गुगल या कंपनीकडूनच पेमेंट मिळत असते.Blogging Mhanje kay Marathi
गुगल कडून किती पैसे मिळतात ?
आता गुगल कडून किती पैसे मिळतात याबद्दल बोलायचे झाल्यास ते सर्व तुमच्या कामावर आणि तुमच्या वेबसाईटवर किती ट्राफिक येत आहे यावर अवलंबून असतं. तुम्ही यामध्ये अनेक वेबसाईट बनू शकता. आणि या अनेक वेबसाईट मधून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. ज्यावेळी तुमच्या पेमेंट मध्ये 100 डॉलर्स पूर्ण होतील त्यावेळी ते पेमेंट तुमच्या बँक खाते वरती जमा केले जाते.
ब्लॉगिंग फ्री मध्ये करता येते का ?
तुम्ही ब्लॉगिंग सुरुवातीला शिकायचे असल्यास फ्री मध्ये देखील करू शकता यासाठी तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अगदी मोफत तुमचा ब्लॉग अथवा वेबसाईट सुरू करू शकता यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे देखील घेतले जात नाहीत. आणि तुम्ही ॲडव्हान्स करायचे असल्यास त्यासाठी तुम्ही होस्टिंग आणि डोमेन अगदी स्वस्त किमतीमध्ये घेऊ शकता आणि तुमची वेबसाईट बनवून घरबसल्या काम करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता.Blogging Mhanje kay Marathi
