Lakhpati Didi Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो आणि सर्व लाडक्या बहिणींनो आपल्या राज्य देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना मी लखपती बनवणार याचाच अर्थ लाडक्या बहिणींना केवळ महिन्याला पंधराशे रुपये वर आम्ही मर्यादित ठेवणार नाही तर त्यांना व्यवसाय करण्यासाठी आम्ही लखपती दीदी या योजनेअंतर्गत मदत करणार.
लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आणि या कर्जाच्या माध्यमातून लाडक्या बहिणी या लखपती कशा होणार या संदर्भात सर्व मदत योजनेमार्फत आम्ही करून केंद्र सरकारच्या या लखपती दीदी योजना ला राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींनी अथवा दीदींनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी योजनेला अधिक व्यापक बनवणार अशी माहिती दिली होती.
आता या लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची पात्रता काय असणार आहे योजनेमधून लाभ कसा मिळवायचा याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.
Lakhpati Didi Maharashtra Online Apply
मित्रांनो लखपती दीदी योजने अंतर्गत देशभरातील महिलांना व्यवसायासाठी लहान मोठ्या उद्योगासाठी बिनव्याजी त्यांच्या व्यवसायाच्या आराखड्यानुसार अथवा मागणीनुसार 01 ते 05 लाख रुपये कर्ज स्वरूपात दिले जाते. या योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास योजनेमधून महिलांना स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभा करून त्यांचे जीवनमान अथवा आर्थिक प्रोत्साहन म्हणून ही लखपती दीदी योजना कार्यरत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतात कारण यामध्ये तुम्हाला बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि त्यामुळे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता बँकेकडे करावी लागते त्या संदर्भात तुम्हाला फॉर्म देखील तुमच्या तहसील कार्यालयामध्ये अथवा संबंधित विभागाकडे जमा करावा लागतो. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी असेल किंवा तुम्ही जमा केलेल्या व्यवसाय आराखड्याबद्दल देखील सर्व माहिती तपासली जाते आणि त्यामधून ज्यांचे अर्ज स्वीकारले जातील त्यांना या योजनेअंतर्गत पात्र केले जाते आणि लाभ देखील दिला जातो.
Maharashtra Lakhpati Didi Yojana 2025
लखपती दीदी योजनेसाठी खालील अटी अथवा निकष असणार आहेत :
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
- अर्जदार महिलेचे अथवा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 03 लाखांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महिला हि 18 ते 50 या वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
- सर्वात महत्त्वाची अट म्हणजे योजनेचा अर्ज करणारी महिला अथवा दीदी ही बचत गटाशी संबंधित असणे देखील बंधनकारक आहे.Lakhpati Didi Yojana Maharashtra
लखपती दीदी योजनेसाठी खालील कागदपत्रे लागणार :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- तहसील उत्पन्नाचा दाखला
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शैक्षणिक पात्रता दाखला
- व्यवसाय आराखडा
Lakhpati Didi Yojana Maharashtra Application Process
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करायचे ?
या योजनेचा अर्ज करण्यासाठी बचत गटामार्फत सरकारकडे अर्ज पाठवावा लागतो कारण योजनेसाठी महिला उमेदवार ही बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक असणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट करू शकता अथवा तुमच्या ग्रामपंचायत मार्फत देखील या योजनेबद्दलची अधिकची माहिती घेऊ शकता.
त्यानंतर तुमच्या व्यवसायाचा व्यवस्थित पद्धतीने तयार केलेला आराखडा देखील तुम्हाला जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पात्र आहात का नाही हे ठरवले जाणार आहे आणि पात्र असल्यास तुम्हाला या योजनेमधून लाभ दिला जाणार आहे.
