राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या दोनच मोठ्या प्रश्नांची वाट पाहत आहेत. पहिला म्हणजे केंद्र सरकारच्या PM किसान सन्माननिधी योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार? आणि दुसरा म्हणजे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९ वा हप्ता खात्यात कधी जमा होणार?
या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. केंद्र सरकारने २३ व्या हप्त्याचे पैसे खात्यात पाठवण्यापूर्वी काही कडक आणि स्पष्ट निर्देश जारी केले आहेत, ज्यामुळे काही चुकांमुळे अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
१. ‘पीएम किसान’ २३ व्या हप्त्यासाठी ‘हे’ २ नियम अनिवार्य:
- फेस ऑथेंटिकेशनद्वारे e-KYC: पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. यासाठी पीएम किसान मोबाईल ॲपच्या माध्यमातून ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा दाखवून केवायसी) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ मे २०२६ पर्यंत ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचा २३ वा हप्ता थांबवला जाईल. (मयत शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यासाठी ही मोहीम सुरू आहे).
- AgriStack फार्मर आयडी (Farmer ID): जमिनीची अचूक नोंदणी ठेवण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याकडे ‘ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी’ असणे अनिवार्य केले आहे. यापूर्वी २० मे पर्यंत नोंदणीची मुदत दिली होती, परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांचे आयडी तयार झालेले नाहीत. २२ वा हप्ता काही सवलतींसह दिला गेला होता, मात्र २३ वा हप्ता फक्त आणि फक्त ‘ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी’ असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल, असे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे मे अखेरपर्यंत ही नोंदणी पूर्ण करून घ्या अशे आवाहन केले गेले आहे.
२. अपात्र शेतकऱ्यांची छाटणी आणि डेटा दुरुस्ती
योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारकडून अपात्र अर्जदारांचा शोध घेतला जात आहे. एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे किंवा कुटुंबात सरकारी कर्मचारी असणे अशा नियमांचे उल्लंघन करणारे शेतकरी अपात्र ठरवले जात आहेत.
गेल्या २२ व्या हप्त्यावेळी महाराष्ट्रात सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. मात्र, अनेकदा लँड सीडिंग (Land Seeding) डेटा मॅच न होणे किंवा नावात तफावत असण्यामुळे पात्र शेतकरीही चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरतात. अशा शेतकऱ्यांनी तातडीने तालुका स्तरावरील पीएम किसान नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला डेटा दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.
३. नमो शेतकरी योजनेचा ९ वा हप्ता कधी मिळणार?
नमो शेतकरी योजनेचा ९ वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच मिळणे अपेक्षित होते. १३ मार्च रोजी पीएम किसानचा हप्ता आला, तेव्हा नमो शेतकरीचा हप्ता निधी अभावी रखडला होता.
- निधीला मंजुरी: राज्य सरकारने आता सन २०२६-२७ च्या बजेटमध्ये प्रलंबित हप्त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.
- वेगवेगळे बजेट हेड: निधी वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आता General (खुला प्रवर्ग), SC आणि ST या तिणीही प्रवर्गांसाठी वेगवेगळे ‘लेखाशीर्ष’ (Budget Head) तयार करून स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नमो शेतकरीचा हप्ता स्वतंत्रपणे वितरित करण्याच्या तयारीत आहे.
हप्ता खात्यात कधी जमा होणार? (संभाव्य तारीख)
सध्या सुरू असलेली पडताळणी पाहता, केंद्र सरकारकडून PM किसानचा २३ वा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. याच कालावधीत राज्य सरकारकडूनही नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.
💡 शेतकरी बांधवांसाठी सल्ला: जर तुमची ई-केवायसी किंवा ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी बाकी असेल, तर ती या महिनाअखेरीस जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर किंवा मोबाईल ॲपद्वारे त्वरित पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचे थकीत आणि येणारे हप्ते विनाअडचण सुरू राहतील.
