अंगणवाडी सेविका आता होणार शिक्षिका नवीन धोरण प्रशिक्षण मिळणार | Anganwadi Sevika Maharashtra 2025

WhatsApp Group Join Now

Anganwadi Sevika Maharashtra 2025 अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक विभाग 2025-2026 पासून लागू होणार आहे आणि यामुळे अंगणवाडी आणि त्यासोबतच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम देखील आता नवीन असणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे देखील यामुळे प्रशिक्षण पार पडणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह केंद्र सरकार द्वारे देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभाग मध्ये करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात देखील आता होत आहे.

Anganwadi Sevika Promotion 2025 Maharashtra

मित्रांनो राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्पामध्ये 553 प्रकल्पांमध्ये तब्बल 1,10,556 अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांमध्ये तब्बल सव्वा लाख च्या आसपास अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.

हे पण वाचा:
Ativrushti Anudan Maharashtra 2024 शेतकऱ्यांना अतिवृष्टी साठी 6475 कोटी रुपये मंजूर सरकारने GR केला प्रसिद्ध | Ativrushti Anudan Maharashtra 2024

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शैक्षणिक विभागामध्ये आता होत असून अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यामध्ये नवीन असणार आहे. याच नवीन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका आणि त्यासोबतच पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे देखील प्रशिक्षण घेतले जाणार आहे

आणि या प्रशिक्षणा अंतर्गत चिमुकल्यांना शिक्षण कसे द्यायचे त्यासोबतच शाळेची गोडी वाढवायची आणि अधिकाधिक जिल्हा परिषद असेल अथवा अंगणवाडी मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने यथोचित प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अंगणवाडी सेविका देखील आता प्रशिक्षण घेणार :

बारावी उत्तीर्ण असलेल्या सेविकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहेत तर ज्या दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका आहेत यांना एक वर्षाकरिता बालशिक्षण प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे. यामुळेच अंगणवाडी दाखल तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षांपर्यंत सर्व पद्धतीने म्हणजेच की सामाजिक असेल बौद्धिक अथवा भावनिक विकास त्यासोबतच खेळ व इतर कलांना देखील प्राधान्य देण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Nuksan Bharpai List 2025 Maharashtra शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रक्कमेत राज्य सरकार कडून मोठा बदल | Nuksan Bharpai List 2025 Maharashtra

अंगणवाडी मधूनच विद्यार्थ्यांना शाळेची ओढ कशी लागेल त्यासोबतच दहावी पास आणि बारावी पास दोन्ही असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना एकाच पातळीवर आणून छोट्या व मोठ्या गटाला अध्ययन कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लवकरच आता सर्व अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे आणि त्यानुसार आता अंगणवाडी सेविका देखील शिक्षणाचे काम करणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन कार्यशाळा देखील झाल्याचे जितेंद्र साळुंखे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य सोलापूर यांनी स्पष्ट केले आहे.Anganwadi Sevika Maharashtra 2025

Anganwadi Sevika Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !