घरकुल पीएम आवास 2025 सर्व्हे साठी पुन्हा मुदतवाढ आता शेवटची संधी 02 लाख अनुदान | Gharkul Yojana 2025 Maharashtra

WhatsApp Group Join Now

Gharkul Yojana 2025 Maharashtra तुम्हाला देखील स्वतःचे हक्काचे घर बांधायचे आहे का परंतु तुम्ही सरकारकडून मिळणाऱ्या पीएम आवास अर्थातच घरकुल योजनेसाठी तुमचा अर्ज अजूनही केला नाही का तर मात्र तुमच्यासाठी आता सरकारकडून पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि आता ही शेवटची संधी असणार आहे. घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत काय असणार आहे या योजनेचा ऑनलाईन अथवा ऑफलाइन अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

घरकुल पीएम आवास योजना 2025 सर्व्हे सुरु आहे का ?

मित्रांनो पीएम आवास योजना 2025 चा सर्वे सध्या सुरू असून यामध्ये तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून पीएम आवास आणि आधार फेस आरडी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमचे अर्ज अथवा सर्वे देखील करू शकता.

यासोबतच ज्या नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने त्यांचे मोबाईल ॲप्लिकेशन वरून अर्ज करताना अडचणी येत असल्यास अशा नागरिकांसाठी ऑफलाइन पद्धतीने देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्या ठिकाणी घरकुल योजनेसाठी असणारा ऑफलाइन अर्ज व त्यासोबत सर्व कागदपत्र जोडायचे आहेत आणि तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे.

हे पण वाचा:
Ayushman Card Download Online 05 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आयुष्मान कार्ड लगेच करा डाऊनलोड | Ayushman Card Download Online

घरकुल योजना अर्ज करण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक

  • आधारकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • रहिवासी दाखला
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशनिंग कार्ड
  • जॉब कार्ड
  • स्वयंघोषणा पत्र

योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा.

अर्जदाराच्या नावावरती कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.

अर्जदाराच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असणे देखील बंधनकारक असणार आहे.

हे पण वाचा:
Pik Vima List 2025 Maharashtra अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा पीकविमा देखील येणार | Pik Vima List 2025 Maharashtra

शहरी भागातील अर्जदार असल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न 03 लाख रुपयांपर्यंत असावे.

Gharkul Yojana 2025 Maharashtra

पीएम आवास घरकुल योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत काय ?

योजनेसाठी अर्ज करण्याची पूर्वीची मुदत 31 मे 2025 देण्यात आली होती परंतु यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे आणि आता तुम्ही 06 जून 2025 पर्यंत या योजनेसाठी तुमचे अर्ज सबमिट करू शकता. यामुळेच लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची सविस्तर व्हिडिओ देखील खाली दिली आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेट साठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता.

हे पण वाचा:
Free Scholarship Girls Maharashtra 2025 मुलींच्या शिक्षणासाठी 05 नवीन स्कॉलरशिप योजना नक्कीच घ्या लाभ | Free Scholarship Girls Maharashtra 2025

Leave a Comment

Join Whatsapp Group !