Ladki Bahin May Hafta List अखेरीस लाडकी बहीण योजनेचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला मे महिन्याचा हप्ता आज दिनांक 05 जून 2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी कालच फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली आहे आणि त्यामुळेच कालच योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज सकाळी पासूनच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत.
आता यामध्ये आज कोणाला पैसे मिळणार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे तसेच हप्ता किती दिवस चालणार या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूया.
लाडकी बहिण मे महिना हफ्ता किती रुपये येणार
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार हा देखील प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारात आहेत कारण विधानसभा निवडणुकांवेळी राज्य सरकार द्वारे आश्वासन देण्यात आले होते की पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ.
या संदर्भात अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाईल आणि निर्णय झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनच 2100 रुपये मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. परंतु 2100 रुपयांबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळेच लाडक्या बहिनींना मे महिन्याचा मिळणारा हप्ता देखील हा 1500 रुपयेच असणार आहे.
मे आणि जून महिना लाडकीचा हफ्ता एकत्रित येणार ?
आता जून महिना सुरू असल्याने अनेक लाडक्या बहिणींना वाटत आहे की मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील आणि आमच्या खात्यावर दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा होतील परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही अथवा शासन निर्णयांमध्ये आणि आपल्या महिला व बालविकास मंत्री यांच्या फेसबुक पोस्टमध्ये देखील एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली आहे की आता जो हप्ता वितरित केला जात आहे तो फक्त आणि फक्त मे महिन्याचा हप्ता असणार आहे जून महिन्याच्या हप्ता बद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींना आज पासून जमा होणारे हफ्ता हा मे महिन्याचा पंधराशे रुपये प्रमाणे असणार आहे.Ladki Bahin May Hafta List
लाडकी बहिण आज कोणत्या जिल्ह्यांत होणार निधी वाटप ?
योजनेसाठी मे महिन्यातला हप्ता आज पासून वितरित होणार आहे आणि हे त्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार तर आपण लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या वितरणावेळी पाहिला आहे की सुरुवातीला विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा पूर्व महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये वितरण केले जाते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल अथवा मुंबई ठाणे असेल या ठिकाणी लाडकी बहिण योजना अंतर्गत पैसे जमा केले जातात त्यामुळे यावेळी देखील त्याच पद्धतीने वाटप होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
