Ladki Bahin Yojana May Hafta Date लाडकी बहिणी योजना राज्यातील सर्वाधिक नावाजलेली योजना आणि या योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता बद्दल मागील काही दिवसांपासून विविध प्रकारचे अपडेट येत आहे परंतु सर्व काही खरे असले तरी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नाही.
खरंतर मे महिना संपायच्या आधी म्हणजेच की 31 मे च्या आधी सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असे मंत्र्यांकडून सांगितले जात होते परंतु प्रत्यक्षात मात्र योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. आता मे आणि जून महिना असे दोन महिन्यांचे एकत्रित लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार का आणि हे पैसे कधी पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
Ladaki Bahin Yojana May Hafta List
मित्रांनो लाडकी पण योजनेअंतर्गत आजवर सर्व पात्र लाडक्या बहिणींना 10 हप्ते मिळाले आहे. यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे हे पैसे लाडक्या बहिणीच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत. यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला होता.
परंतु त्यावेळी मार्च ते मार्च बँकेचे आर्थिक वर्ष असते आणि त्यामुळे काही तांत्रिक अडचणी असतात आणि त्यामुळे योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास काही विलंब झाला असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वतीने स्पष्ट केले होते. परंतु आता मे महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील असेच काही झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण मे महिन्याचा हप्ता देखील मे महिन्या संपला तरी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती अजूनही जमा झालेले नाहीये.
लाडकी बहिण योजना मे महिना हफ्ता कधी येणार
आता सर्व लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की आमचे मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार कारण आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिनांक 23 मे रोजी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील.
अजित दादांनी ही घोषणा केल्यानंतर राज्य सरकार द्वारे हप्त्याच्या वितरण संदर्भात ३३५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यामुळेच दोन ते तीन दिवसांत सर्व लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होईल असे बोलले जात होते.
परंतु प्रत्यक्षात मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाहीत. यामध्ये आता महत्त्वाचे कारण समोर आले आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला कारण यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते आणि निकषांमध्ये नसून देखील भरगच्च पगार असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व सरकारी नोकरदार बहिणींवर आता कारवाई करून त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल देखील केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.Ladki Bahin Yojana May Hafta Date
लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार मे-जून महिन्याचे 3000 रुपये ?
आता जून महिना देखील सुरू होत आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिनींना मी आणि जून महिन्याचा एकत्रित हप्ता मिळणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणीने विचारत आहेत परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाहीये कारण सध्या तरी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना फक्त मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे जून महिन्याचा हप्ता हा लगेच जमा होणार नाही तर मे महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जून महिन्या अंतर्गत पंधराशे रुपये जमा होतील.
