Ladki Bahin Yojana May Hafta लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता हा जून महिना सुरू झाला तर देखील लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती अद्याप जमा झाला नाही आणि त्यामुळेच मे महिन्याचे पैसे आता येणार का नाही असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारात आहेत.
योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता बद्दल बोलायचे झाल्यास यासाठी 335 कोटींचा निधी हा महिना बाल विकास विभागाकडे देण्यात आला होता परंतु तरीदेखील लाडकीच्या बँक खात्यावरती अजूनही पैसे जमा झाले नाहीत. आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात कधी होणार आणि इतर सर्व सविस्तर माहिती आपण पाहूया.
Ladki Bahin Yojana May Installment Date
नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना या योजनेचा मे महिन्याचा हप्ता मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. विधानसभा इलेक्शन आधी लाडक्या बहिणींना एक दोन महिन्यांचे पैसे हे आधीच जमा होत होते परंतु आता महिना संपला आहे तरी देखील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आले नाहीत.
हे फक्त मे महिन्याचे नाही तर एप्रिल महिन्याच्या हप्त्यावेळी देखील अशी परिस्थिती झाली होती आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता मे महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. यासाठी सोमवारपासून बँका सुरू झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल.Ladki Bahin Yojana May Hafta
लाडकी बहिण मे हफ्ता उद्यापासून जमा होणार ?
एप्रिल महिन्याचा हप्ता ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती 02 मे पासून जमा होण्यास सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने मे महिन्याचा हप्ता देखील सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 02 जून पासून सुरुवात होईल आणि चार-पाच दिवसांच्या अंतरामध्ये सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा होतील.
या बहिणींना नाही मिळणार मे महिन्याचा हफ्ता :
आता यामध्ये मागील चार-पाच दिवसांमध्ये अनेक खात्यांची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यामधून सरकारी नोकरदार असणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, तसेच कुटुंबाकडे चार चाकी वाहन असलेल्या महिला, अडीच लाख पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला अशा सर्व महिलांना योजनेमधून बाद केले आहे आणि त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.Ladki Bahin Yojana May Hafta
मे आणि जून महिन्याचा हफ्ता एकत्रित येणार ?
मागील काही दिवसात अनेक प्रकारच्या बातम्या काही ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित जमा होणार असे देखील काही रिपोर्ट नुसार माहिती देण्यात आली होती परंतु याबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि त्यानुसार हा जमा होणारा हफ्ता हा फक्त मे महिन्याचा असणार आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जमा होणारे पैसे हे 1500 रुपयांप्रमाणेच असतील याची सर्व महिलांनी नोंद घ्यायची आहे.
