PM Awas yojana 2025 Maharashtra Online नमस्कार मित्रांनो पीएम आवास अर्थातच घरकुल ग्रामीण व शहरी या दोन्ही योजनांसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुमची नोंदणी अथवा सर्वे प्रक्रिया करू शकता आणि यासाठी पूर्वीची 31 मे 2025 पर्यंतची अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आणि त्यामुळेच तुम्ही अजूनही योजनेसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे आता एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे आणि म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी तुमचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्हाला सोयीची आहे त्या पद्धतीने अर्ज करू शकता.
Gharkul PM Awas Yojana 2025 List
मित्रांनो संपूर्ण भारत देशामध्ये पीएम आवास योजना कार्यरत असून या योजनेमध्ये आजवर जवळपास मिळालेल्या आकडेवारीनुसार 92 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल अथवा घर बांधण्यामध्ये केंद्र सरकार द्वारे अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की देशातील सर्व गरजूंना शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही आणि जसे जसे महागाई वाढत आहे त्या पद्धतीने आम्ही योजनेच्या निधीमध्ये देखील वाढ करून सर्व ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत अशा सर्वच्या सर्व नागरिकांना आम्ही पक्की घरे त्यांच्या हक्काचे घरकुल देणार आहोत.
Gharkul Sarkari Jaga Arja 2025 Maharashta
स्वत:च्या मालकीची जमीन नसल्यास तरीही देणार घरकुल सरकारी जागा :
मित्रांनो मागील काही वर्षांमध्ये अनेक असे लाभार्थी होती की ज्यांना घरकुल मंजूर झाले परंतु त्यांना स्वतःची जागा नसल्याने त्यांना घर बांधता येत नव्हते आणि यामुळे असे अनेक नागरिक होते याबद्दल तक्रारी करत होते. यावर उपाय म्हणून मागील वर्षापासून सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या योजनेच्या नावाने नवीन योजना सुरू केली.
या योजनेचा उद्देश हात होता की गावामध्ये गायरान जमीन अथवा सरकारी मालमत्तेचे असणाऱ्या जमिनी संबंधित घरकुल धारकांना देणे आणि त्यांना त्यांचे घर बांधण्यासाठी सहाय्य देणे. आता यामध्ये काही अशी देखील गाव होते की जिथे गायरान जमीन अथवा सरकारी मालमत्तेची जमीन शिल्लक नव्हती मग त्या ठिकाणी या योजनेअंतर्गतच जागा खरेदीसाठी 01 लाख रुपये सरकार द्वारे दिले जातात यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायत मार्फत सर्वे अथवा नोंदणी करावी लागते.PM Awas yojana 2025 Maharashtra Online
Gharkul PM Awas Yojana 2025 Documents List Marathi
घरकुल योजनेचा ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्र असणे आवश्यक असणार आहे : PM Awas yojana 2025 Maharashtra Online

- आधारकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशनिंग कार्ड
- जॉब कार्ड
- स्वयंघोषणा पत्र