Ativrushti Nuksan Bharpai 2025 नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने थैमान घातल्याच्या पण पाहिले आहे आणि यामध्ये सर्वाधिक जास्त फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे.
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीस तोंड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काल दिनांक 27 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे किंवा इतरही कुटुंब असतील ज्यांच्या घराचे अथवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे याबद्दलची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.
Ativrushti Nuksan Bharpai Pune 2025
मित्रांनो यावर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर राज्यात सर्वत्र भर असत आहे. मान्सूनच्या एक आठवडे आधीच राज्यभरामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे यामध्ये मागील दोन चार दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुका, बारामती तालुका आणि दौंड तालुक्यांमध्ये मागील 40-50 वर्षांमध्ये झाला नसेल एवढा मोठा पाऊस पडला.
आणि या पावसामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले फळबागा असतील, पालेभाज्या असतील अथवा इतर भुसार पिके, कांदा यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे देखील आपणास पाहायला मिळाले. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या सर्व नुकसानीचा आढावा घेतला आणि नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये लवकरात लवकर नुकसान पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला आदेश दिले आहेत.
Ativrushti Nuksan Bharpai Panchnama 2025
यामध्ये काही शेतकऱ्यांकडून मात्र मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे कारण पंचनामे करण्यात व इतर बाबींमध्ये वेळ न घालवता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचे काही शेतकऱ्यांनी त्यांनी आवाहन केले होते परंतु सरसकट मदत देणे शक्य नसल्याचे देखील बोलले जात आहे.
नुकसान भरपाई बद्दल बोलायचे झाल्यास राज्यात रविवार दिनांक 25 मे 2025 पर्यंत सुमारे 34 हजार हेक्टर वरील शेत पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे आणि खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसला आहे यामुळे शेतकरी सरकारकडून चांगल्या प्रकारची मदत मिळेल याची अपेक्षा देखील करत आहे आणि काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्येच ही रक्कम अथवा मदत जाहीर होईल अशी देखील शेतकऱ्यांना आशा होती परंतु यामध्ये पंचनामे झाल्याशिवाय मदत देता येणार नसल्याचे देखील सांगितले गेले आहेत.
Shetkari Karjmafi List 2025 Maharashtra
यामध्ये काही शेतकरी नेत्यांकडून अथवा काही भागातील शेतकऱ्यांकडून अशी देखील मागणी केली जात आहे की विधानसभा निवडणुकांत वेळी ज्या पद्धतीने या सरकारने घोषणा केली होती की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून आता सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात आहे कोलमडून पडला आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर करावी जेणेकरून या संकटाला तोंड देण्याची शेतकऱ्यांमध्ये ताकद येईल असे देखील काही शेतकरी नेते बोलत आहे.Ativrushti Nuksan Bharpai 2025
