PM Awas Yojana Maharashtra 2025 मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे देशभरात सर्व गरजूंना पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल म्हणजेच स्वतःच्या हक्काचे घर आम्ही देणार यानुसार योजनेच्या 2025 च्या सर्वेक्षणासाठी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता तर सर्वांसाठी सर्व गरजूंसाठी ज्यांना घरकुल पाहिजे त्यांना अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे.
घरकुल योजनेचा अर्थातच पीएम आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी आता मोठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व नागरिकांना आणि ज्यांना आता कायमस्वरूपी घर पाहिजे आहे त्यांच्यासाठी मोठा दिलासा या घोषणेच्या माध्यमातून मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
PM Awas Yojana 2025 Maharastra
तर मित्रांनो तुम्ही अजूनही पीएम आवास या योजनेसाठी तुमचा अर्ज केला नाही परंतु तुम्हाला योजनेचा अर्ज करायचा असल्याचा या योजनेसाठी तुमच्याकडे अर्ज करण्याकरता घरकुल शहरी आणि घरकुल ग्रामीण दोन्हीसाठी 30 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची अथवा सर्वेची मुदत असणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये मिळालेल्या आकडेवारीनुसार योजनेमध्ये सुमारे 92 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊन त्यांच्यासाठी मजबूत आणि हक्काचे घर बांधण्यात आले आहेत. पीएम आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या अथवा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला सरकारकडून घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून 2.5 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते.
अर्थातच या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही प्रमाणामध्ये अटी व निकष देखील असणार आहेत त्यासोबतच कागदपत्र देखील लागणार आहेत त्याबद्दलची माहिती देखील खाली देण्यात आलेली आहे.
Pm Awas Yojana 2025 Eligibility Criteria
योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय रहिवासी असावा.
अर्जदाराच्या नावावरती कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असणे देखील बंधनकारक असणार आहे.
शहरी भागातील अर्जदार असल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वार्षिक उत्पन्न 03 लाख रुपयांपर्यंत असावे.
योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
- आधारकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशनिंग कार्ड
- जॉब कार्ड
- स्वयंघोषणा पत्र

Pm Awas Yojana 2025 Apply Online Link
योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुमचे अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून आवास प्लस आणि आधार फेस आरडी या दोन मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करून तुमचे अर्ज अथवा सर्वे सबमिट करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने शक्य नसल्यास यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील तुमचे अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्या ठिकाणी ऑफलाइन अर्ज व त्यासोबत वर दिलेली सर्व कागदपत्र जोडायचे आहेत आणि तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अथवा नगरपंचायत मध्ये सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा सर्वे हा सबमिट करून तुम्हाला योजनेअंतर्गत सर्व निकष तपासून लाभ देण्यात येईल.